कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.
शासनाच्या परिवहन विभागाने उपप्रादेशिक परिवहन विभाग कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वाहनांना उच्च सुरक्षा वाहन पट्टी बसविण्याचे काम मेसर्स रिअल माझाॅन…
बेकायदा चाळी उभारणाऱ्या चार बांधकामधारकांच्या विरुध्द कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून हिललाईन पोलीस…
एका सामाजिक कार्यकर्ता महिलेने याप्रकरणाची महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बालकाला बेवारस स्थितीत सोडून देणाऱ्या अनोळखी व्यक्तिंविरुध्द गुन्हा…