कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड (Karad) असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना (Krushna and Koyna) या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर आहे. या नद्या महाबळेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र होत. कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कराड समग्र दर्शन हे विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे.Read More
अहमदाबाद परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात पाच गुंडांनी दिल्लीमार्गे गोव्यात येऊन मौजमजा केली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये देवदर्शन करून, ते मुंबईला जात असताना…
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधी पक्षांचा जागोजागी पराभव होवून मोठे नुकसान झाले, अशी हताश भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष, आमदार…
काँग्रेसने देशात लोकशाही आणली, पण विधानसभेतील निवडणुकीनंतर लोकशाही जिवंत आहे का, असा प्रश्न सर्वांसमोर आहे. लोकसभेनंतर चार महिन्यांत विधानसभेच्या निकालाचे…
पोलिसांच्या माहितीनुसार महामार्गावर रात्रीच्या सुमारास निपाणी (कर्नाटक) येथून टेम्पो गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती तळबीडचे प्रभारी किरण भोसले यांना मिळाली…