कराड Videos

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड (Karad) असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना (Krushna and Koyna) या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर आहे. या नद्या महाबळेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र होत. कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कराड समग्र दर्शन हे विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे.
Read More
Aaditya Thackeray: दुचाकीस्वाराचा अपघात, आदित्य ठाकरेंनी काय केलं पाहा Video Viral
Aaditya Thackeray: दुचाकीस्वाराचा अपघात, आदित्य ठाकरेंनी काय केलं पाहा Video Viral

कराड टोल नाक्याच्यापुढे एका बाईकस्वाराचा अपघात झाला होता. आमदार आदित्य ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावरून परतत असताना त्यांनी हे पाहिलं. त्यावेळी…

ताज्या बातम्या