करण कुंद्रा (Karan Kundrra) हा हिंदी मालिका विश्वामधील आघाडीचा अभिनेता आहे. २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत’ है या मालिकेद्वारे त्याने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्याने ‘ये कहा आ गए हम’, ‘दिल ही तो है’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या अनेक लोकप्रिय हिंदी टिव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मुबारका’ आणि ‘१९२१’ अशा काही चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. एमटिव्ही वाहिनीवरील बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्याने काम केले आहे. बिग बॉस हिंदीच्या १५व्या पर्वामध्ये त्याने भाग घेतला होता.
या कार्यक्रमामध्ये करण उपविजेता ठरला होता. बिग बॉसच्या घरामध्ये तो तेजस्वी प्रकाशला भेटला. पुढे ते दोघे डेट करायला लागले. याआधी तो अनुशा दांडेकरबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता. करण सूत्रसंचालक म्हणूनही प्रसिद्ध आहे. Read More