करीना कपूर खान Photos
अभिनेत्री करीना कपूर खानचा जन्म २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईत कपूर घराण्यात झाला होता. तिचे वडील अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता अभिनेत्री होती. करीनाची मोठी बहीण करिश्मा कपूरही अभिनेत्री आहे. तिने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं असून तिला तैमूर आणि जहांगिर नावाची दोन मुलं आहेत. करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली. मिठीबाई कॉलेजमध्ये तिने दोन वर्षे कॉमर्सचा अभ्यास केला. शिकत असतानाच तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. त्यासाठी शिक्षण सोडून तिने मुंबईतील एका अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला. तिने २००० साली ‘रेफ्युजी’मधून अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘तिने मुझे कुछ केहना है’, ‘यादें’, ‘अजनबी’, ‘अशोका’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘तलाश द हाँट बिगिन्स’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हू’’, ‘एलओसी कारगिल’, ‘चमेली’, ‘युवा’, ‘देव’, ‘फिदा’, ‘ऐतराज’, ‘हलचल’, ३ इडियट्स, ‘एजेंट विनोद’, ‘हिरोईन’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘लाल सिंग चड्ढा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More