केदारनाथ Photos

भारतामधील आठ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ (Kedarnath) मंदिर पर्यटनासाठी खूप लोकप्रिय आहे. उत्तराखंड राज्यामध्ये वसलेल्या या मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक जमत असतात. त्यातही महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

महाभारतामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. केदारनाथ गाव समुद्रसपाटीपासून ३,५८३ मीटर उंचीवर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे. गौरीकुंड या गावापर्यंतच वाहनाने प्रवास शक्य असून केदारनाथला पोचण्यासाठी तेथून १४ किलोमीटर (८.७ मैल) अंतर पायवाटेने पार करावे लागते.

केदार (Kedar) हे भगवान शंकराचे नाव आहे. त्यातल्या केदार शब्दाचा अर्थ जमीन, शेती किंवा भूमीशी लावला जातो आणि नाथ या शब्दाचा वापर स्वामी किंवा रक्षक या अर्थाने केलेला आढळतो. २०१३ मध्ये या ठिकाणी महापूर आला होता. त्यावेळी तेथे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली होती.
Read More