कियारा अडवाणी ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. २०१४ साली ‘फुगली’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु, तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. क्रिकेटर धोनीच्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर ‘कबीर सिंग’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘लक्ष्मी’, ‘गुड न्यूज’, ‘शेरशाह’ या चित्रपटात कियारा झळकली होती. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर कियारा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आणि कुटुंब आणि मित्रांसह या सणाचा आनंद लुटला. चला,…