किरण माने Photos
अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या किरण मानेंचा (Kiran Mane) जन्म ५ एप्रिल १९७० रोजी सातारा जिल्ह्यामधील मायणी गावामध्ये झाला. शाळेमध्ये असताना अभिनय, नाटक अशा गोष्टींबद्दल त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली. सातारा (Satara) पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली आहे. सुरुवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी गावामध्ये विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचं दुकान उघडलं. दुकानामध्ये काम करताना त्यांना अभिनयाच्या कोर्सची जाहिरात दिसली. ती पाहून मानेंही अभिनय शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘श्री तशी सौ’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘गोविंद घ्या गोपाळ घ्या’, ‘मनोमिलन’ अशा नाटकांमध्ये काम केले आहे.
‘स्वराज्य’, ‘ऑनड्युटी २४ तास’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत. ‘अपहरण’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते काम करत आहेत. लिहण्याची आवड असणारे किरण माने सोशल मीडियावर फार व्यक्त होत असतात. त्यांनी लिहिलेल्या एका पोस्ट्समुळे ते चर्चेत आले होते. याच दरम्यान त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून काढण्यात आले. फेसबुक पोस्टमुळे मालिकेमधून काढल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये म्हटले.
या प्रकरणामुळे ते खूप चर्चेत आले होते. त्यानंतर किरण मानेंनी बिग बॉस (Bigg Boss)मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये सहभाग घेतला. ते या पर्वामध्ये उपविजेते ठरले.Read More