केएल राहुल News

Kl Rahul

कन्ननूर लोकेश राहुल (KL Rahul) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे.


के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या.


पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने (RCB)राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे. २०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.


कन्ननूर लोकेश राहुल (के.एल.राहुल) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे. के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता.


के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या. पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे.


२०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. के.एल.राहुल त्याच्या एकूण कारकीर्दीमध्ये बऱ्याचवेळा दुखापतग्रस्त झाला आहे. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाल्याचे पाहायला मिळते. आयपीएल २०२३ मध्ये एका सामन्यादरम्यान त्याला पुन्हा इजा झाली होती. सध्या तो पूर्णपणे फीट झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. आशिया कप २०२३ साठी त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने तो खेळणार नसल्याचेही म्हटले जात आहे.



Read More
Sunil Shetty Statement on KL Rahul Kantara Celebration in Bengaluru After Delhi Capitals Win
VIDEO: “मी त्याला कॉल केला अन् म्हणालो…”, राहुलच्या कांतारा सेलिब्रेशनवर सासरेबुवा सुनील शेट्टीचं वक्तव्य; म्हणाले, “अंगावर काटा आला”

Sunil Shetty on KL Rahul: केएल राहुलने बंगळुरूच्या मैदानावर केलेलं कांतारा स्टाईल सेलिब्रेशनबाबत त्याचे सासरे आणि बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीने…

Virat Kohli KL Rahul Fight in DC vs RCB Live Match Video Goes Viral IPL 2025
DC vs RCB: विराट-राहुलमध्ये चालू सामन्यातच जुंपली, नेमका कशावरून झाला वाद? VIDEO व्हायरल

Virat Kohli KL Rahul Fight Video: आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरू असताना विराट कोहली आणि केएल राहुलमध्ये चांगलीच…

Virat Kohli Teasing KL Rahul with This is My Ground Celebration After RCB win Over DC Video Viral
VIDEO: विराट कधीच विसरत नाही! विजयानंतर राहुलला ‘हे माझं ग्राऊंड’ सेलिब्रेशन करत चिडवलं; सर्वांसमोर उडवली खिल्ली फ्रीमियम स्टोरी

Virat Kohli KL Rahul Video: आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवत मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला आहे. या विजयानंतर विराट कोहलीने…

Kl rahul ignored sanjeev goenka
KL Rahul : मॅच संपल्यावर लखनऊचे संघमालक राहुलला भेटायला आले, पुढे जे घडलं एकदा पाहाच- VIDEO फ्रीमियम स्टोरी

KL Rahul – Sanjeev Goenka Viral Video: लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर केएल राहुल आणि संजीव…

kl rahul lsg vs dc ipl 2025
LSG vs DC: केएल राहुलचा खणखणीत षटकार अन् दिल्लीचा लखनऊवर दणदणीत विजय! गुणतालिकेत मोठी झेप

IPL 2025, LSG vs DC Match Highlights: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने…

KL Rahul Trolls Kevin Pietersen Said A Mentor is Someone who goes to Maldives 2 Weeks Mid Season Video V
GT vs DC: “मेन्टॉर तो असतो जो २ आठवडे मालदीवला जातो”, केएल राहुलने सर्वांसमोर केविन पीटरसनची उडवली खिल्ली, पाहा VIDEO

KL Rahul trolls Kevin Pietersen: केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्स संघाचा मेन्टॉर केविन पीटरसनला ट्रोल केलं आहे.

GT vs DC KL Rahul Creates History Becomes The Fastest Indian To Smash 200 Sixes In IPL 2025 amd-
KL Rahul Record: केएल राहुलने रचला इतिहास! विराट, रोहित, धोनीला मागे सोडत असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

Fastest 200 Sixes In IPL :दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

KL Rahul Celebration Video Shouts And Shows This is My Home Ground Bengaluru After DC beat RCB Video
RCB vs DC: “हे माझं होमग्राऊंड आहे…”, षटकार लगावला, मग बॅट आदळली; राहुलचं दिल्लीच्या विजयानंतरचं सेलिब्रेशन होतंय व्हायरल; पाहा VIDEO फ्रीमियम स्टोरी

KL Rahul Celebration Video: केएल राहुलने बंगळुरूच्या मैदानावर ९३ धावांची उत्कृष्ट खेळी करत एकट्याच्या बळावर दिल्लीला सामना जिंकून दिला. या…

DC beat RCB by 6 Wickets KL Rahul Inning Delhi Capitals 4th Consecutive win IPL 2025
RCB vs DC: दिल्लीने RCBकडून हिसकावला विजय, कॅपिटल्सचा सलग चौथा विजय; केएल राहुल ठरला हिरो

RCB vs DC: चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स सामन्यात दिल्लीच्या संघाने बंगळुरू संघाकडून विजय हिसकावून घेतला.

ताज्या बातम्या