केएल राहुल Videos

Kl Rahul

कन्ननूर लोकेश राहुल (KL Rahul) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे.


के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या.


पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने (RCB)राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे. २०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.


कन्ननूर लोकेश राहुल (के.एल.राहुल) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे. के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता.


के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या. पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे.


२०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. के.एल.राहुल त्याच्या एकूण कारकीर्दीमध्ये बऱ्याचवेळा दुखापतग्रस्त झाला आहे. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाल्याचे पाहायला मिळते. आयपीएल २०२३ मध्ये एका सामन्यादरम्यान त्याला पुन्हा इजा झाली होती. सध्या तो पूर्णपणे फीट झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. आशिया कप २०२३ साठी त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने तो खेळणार नसल्याचेही म्हटले जात आहे.



Read More

ताज्या बातम्या