कोकण रेल्वे

उदरनिर्वाहासाठी कोकणामधील (Konkan) असंख्य लोक मुंबईकडे रवाना होऊन मिळेल ते काम करुन राहू लागले, त्यातील बहुसंख्य गिरण्यांमध्ये काम करत असतं. कोकणी माणसासाठी सण-उत्सव फार महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी गावाला जाण्यासाठी पूर्वी जहाजाचा प्रवास करावा लागे. पुढे एसटी आल्यानंतर चाकरमान्याचे कमी हाल होऊ लागले. पण हा प्रवास त्रासदायक असे. दरम्यानच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे असावी असा विचार काहींच्या मनात आला. त्यात मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने करावा लागे. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी या कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे विभाग उभारण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती लोकांमध्ये होती. जॉर्ज फर्नान्डिस यांच्या नेतृत्वाखाली कोकणी नेत्यांनी केंद्रामध्ये कोकण रेल्वे बांधण्याची मागणी केली. १९६६ साली दिवा-पनवेल रेल्वेचा मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला.

१५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा (Konkan Railway) पायाभरणी समारंभ पार पडला. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. १९९८ मध्ये कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आणि १९ जुलै १९९९ रोजी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना कोकण रेल्वेचा लाभ घेता आला.
Read More
Konkan Railway line, Mega block, Konkan Railway,
कोकण रेल्वे मार्गावर सलग चार दिवस मेगा ब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावरील पदुबिद्री स्टेशनवरील पॉइंट क्रमांक १०३ आणि ११६ बदलण्यासाठी एनआय मेगा ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Changes in the stops of Tejas Janshatabdi and Mangaluru Express coming from Konkan to Mumbai
कोकण रेल्वेच्या एक्स्प्रेसची धाव दादरपर्यंत

गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट क्रमांक १२, १३ च्या विस्तारीकरणाचे कामे सुरू असून…

Overhead wire failure on Konkan Railway line
कोकण रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड ; ११ गाड्यांना फटका, वहातूक सुरळीत करण्यास रेल्वे प्रशासनाला यश

कोकण रेल्वे मार्गावरील  रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी दरम्याने ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.

Mumbai to Konkan Holi Special Train Schedule
Mumbai to Konkan Holi Special Train : कोकणात जाण्यासाठी विशेष आणि जादा विशेष गाड्यांची सोय, तिकिटविक्री अन् वेळापत्रक जाणून घ्या

Mumbai Konkan Holi Special Train : कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेचे आरक्षण संपले असून विशेष गाड्यांचेही आरक्षण संपत आले आहे.

train services on konkan route partially cancelled passengers inconvenienced due to work at csmt
कोकण मार्गावरील रेल्वेची सेवा अंशत: रद्द, सीएसएमटी येथील कामांमुळे प्रवाशांचे हाल

संपूर्ण पायाभूत कामे नोव्हेंबर २०२४ पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले होते. परंतु, हे काम इच्छित वेळेत पूर्ण न झाल्याने…

konkan railway loksatta news
मुंबई : कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या विलंबाने धावणार

कोकण रेल्वेवरील मुल्की स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्त शनिवारी आणि रविवारी ब्लाॅक घेण्यात आला आहे.

special train konkan news
होळीनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वेगाडी

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, होळीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार…

Konkan Holi Special Train, Konkan, Train,
कोकणातील चाकरमान्यांसाठी शिमाग्यानिमित्त विशेष रेल्वे, विदर्भातही होळीनिमित्त गाड्या

मध्ये रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागांतून चाकरमान्यांना होळी सणानिमित्त कोकण आणि विदर्भात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Anganewadi Jatra 2025 Special Trains timetable
Anganewadi Jatra 2025 : आंगणेवाडीच्या यात्रेसाठी धावणार कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Anganewadi Jatra 2025 Special Trains : आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेसाठी कोकण रेल्वेने मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून विशेष ट्रेन्सची घोषणा…

central railways mega block at roha yard on tuesday will delay trains on Konkan route
कोकणातील गाड्या रखडणार

मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लाॅक घेतला असून त्यामुळे कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. कोकण रेल्वे मार्गावरील काही…

Konkan Railway schedule updates in marthi
कोकणातील रेल्वेगाड्या आता दादरपर्यंत; सीएसएमटी फलाट १२, १३ चे विस्तारीकरण; २८ फेब्रुवारीपर्यंत नियोजन

संपूर्ण पायाभूत कामे नोव्हेंबर २०२४ पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले होते. परंतु, हे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने…

संबंधित बातम्या