कोकण रेल्वे Videos

उदरनिर्वाहासाठी कोकणामधील (Konkan) असंख्य लोक मुंबईकडे रवाना होऊन मिळेल ते काम करुन राहू लागले, त्यातील बहुसंख्य गिरण्यांमध्ये काम करत असतं. कोकणी माणसासाठी सण-उत्सव फार महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी गावाला जाण्यासाठी पूर्वी जहाजाचा प्रवास करावा लागे. पुढे एसटी आल्यानंतर चाकरमान्याचे कमी हाल होऊ लागले. पण हा प्रवास त्रासदायक असे. दरम्यानच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे असावी असा विचार काहींच्या मनात आला. त्यात मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने करावा लागे. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी या कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे विभाग उभारण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती लोकांमध्ये होती. जॉर्ज फर्नान्डिस यांच्या नेतृत्वाखाली कोकणी नेत्यांनी केंद्रामध्ये कोकण रेल्वे बांधण्याची मागणी केली. १९६६ साली दिवा-पनवेल रेल्वेचा मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला.

१५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा (Konkan Railway) पायाभरणी समारंभ पार पडला. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. १९९८ मध्ये कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आणि १९ जुलै १९९९ रोजी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना कोकण रेल्वेचा लाभ घेता आला.
Read More
A huge crowd of people from Mumbai thane going to Kokan for Ganeshotsav gathered at Diva railway station today
Konkan Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची तोबा गर्दी; गाडीत पाय ठेवायलाही जागा नाही

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी आज दिवा रेल्वे स्थानकात झाली होती. सकाळी ६.२०ची दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकणवासीयांनी…