कामगार दिवस २०२४ Videos

१ मे रोजी जगभरामध्ये कामगार दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार चळवळींचे स्मरण व्हावे या उद्देशाने दरवर्षी ८० पेक्षा जास्त देशामध्ये १ मे रोजी नागरिकांना सुट्टी दिली जाते. काही देशांमध्ये कामगार दिन अनधिकृतरित्या साजरा केला जातो. भारतामध्येही या दिवसाला फार महत्त्व आहे. आपल्या देशाला देखील कामगार चळवळींचा मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये १ मे ला महाराष्ट्र दिनासह कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा पाहायला मिळते.

युरोपामध्ये औद्याोगिक क्रांती झाल्यानंतर कामगार ही नवी संकल्पना उदयास आहे. पुढे युरोपातील देशांमध्ये कारखाने, औद्योगिक वसाहतींसह कामगाराचे प्रमाण देखील वाढू लागले. कालांतराने ही क्रांती जगभर पसरली. यामुळे जागतिक स्तरावर कामगार वर्गाची निर्मिती झाली. कालांतराने मालक आणि कामगार असे दोन गट तयार झाले. मालक किंवा वरिष्ठ अधिकारी गरीब,गरजू कामगारांचे शोषण करत असत. १९ व्या शतकाची सुरुवात झाल्यानंतर कामगार चळवळी उदयास आल्या.

कामगार दिन या संकल्पनेची सुरुवात ‘कामाचे शिफ्ट ८ तासांची करावी’ या मागणीापासून झाली असे म्हटले जाते. २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या शिफ्टबाबत आंदोलन करत १ मे रोजी सुट्टी जाहीर केली. त्यानंतर अनेक देशांनी १ मे या दिवशी सुट्टी घेत तो दिवस कामगार दिन म्हणून साजरा करायचे ठरवले. १ मे १८८६ रोजी अमेरिकेमध्ये आंदोलनकर्ते उठाव करायला लागले. तीन दिवसांनंतर ४ मे १८८६ रोजी सरकारविरोधात उठाव करत असलेल्या आंदोलनकर्त्यांना पळवून लावण्यासाठी पोलीसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ६ जणांचा मृत्यू झाला.

या घटनेच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन यांनी केली. त्यानुसार १ मे १८९० रोजी पॅरीसमध्ये दुसऱ्या आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले गेले. या परिषदेमध्ये १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर कालातरांने दरवर्षी कामगार दिन साजरा केला गेला.
Read More

ताज्या बातम्या