लता मंगेशकर

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर शहरात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक (Singer) होते. गायनासह ते संगीत नाटकांमध्ये काम देखील करत असतं. गायनाचा सूर त्यांच्याकडून लता यांच्यापर्यंत पोहोचला. वडिलांच्या निधनांनंतर आईची आणि चार लहान भावंडांची जबाबदारी लता यांच्यावर पडली. कुटूंबाचा भार उचलण्यासाठी त्यांनी फार लहान वयामध्ये गायनाला सुरुवात केली. घरामध्ये सर्वात मोठ्या असल्यामुळे घरामध्ये त्यांना दीदी म्हणत असतं. पुढे त्यांना सर्वजण लतादीदी म्हणू लागले. आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची भावंडं आहेत. भारताची गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लतादीदींनी आजवर ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अजरामर गाणी आजही ऐकली जातात. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या असंख्य पुरस्कारांवर त्यांचे नाव कोरले आहे. २००१ साली त्यांनी भारतरत्न या सर्वाेच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०२२ मध्ये करोना काळामध्ये त्यांना या आजाराची लागण झाली. उपचार सुरु असताना त्यांचे अवयव हळूहळू निकामी होत गेले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.
Read More
Lata Mangeshkar
‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे लता मंगेशकर यांचे गाणे ऐकल्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झालेले भावूक; आठवण सांगत म्हणालेल्या….

Lata Mangeshkar: दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची आज ९४ वी जयंती आहे.

Didi Award announced to famous playback singer Sanjeevani Velande
पुणे : फोटो २० संजीवनी भेलांडे,दीदी पुरस्कार संजीवनी भेलांडे यांना जाहीर

मा. दीनानाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांना यंदाचा दीदी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Shaan
“त्यांनी माझ्या वडिलांना…”, लोकप्रिय गायक शानने सांगितली मंगेशकर कुटुंबाबतची ‘ती’ गोष्ट

Shaan : लोकप्रिय गायक शानने एका मुलाखतीत मंगेशकर कुटुंबीयांबरोबर असलेल्या संबंधाबाबत वक्तव्य केले आहे.

anuradha paudwal
Anuradha Paudwal : अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, मृदू आवाजाने मनं जिंकणाऱ्या गायिकेचा सन्मान

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना या वर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.

Pandit Hridaynath Mangeshkar, Shivacharitra Ek Soneri Paan, Shivacharitra Ek Soneri Paan Song on launch, Pandit Hridaynath Mangeshkar Launches Shivacharitra Ek Soneri Paan, 350th Shivrajyabhishek Day,
दीदीची उणीव सतत भासते – हृदयनाथ मंगेशकर, ‘शिवचरित्र-एक सोनेरी पान’ या गीताचे मंगेशकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ‘शिवचरित्र – एक सोनेरी पान’ या गीताचे लोकार्पण ज्येष्ठ…

veer savarkar poem memory
वीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ कविता, लता मंगेशकरांनी सांगितलेली आठवण आणि शंकर वैद्यांनी उलगडलेला अर्थ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला’ कविता ही आजही भारतीयांच्या मनात घर करुन राहिली आहे.

mumbai, cm eknath shinde, lata mangeshkar, international college, music virtually breaks ground, santacruz,
मुंबई : लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाइन भूमीपूजन

भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध असे संगीत महाविद्यालय असावे, या उद्देशाने राज्य शासनाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि…

kangana ranaut indirectly taunts and slams bollywood stars
“मी कोणाच्याही लग्नात नाचले नाही”, कंगना रणौतची ‘ती’ पोस्ट चर्चेत; लता मंगेशकरांचा उल्लेख करत म्हणाली…

“कोणीही कितीही आमिष दाखवलं…”, कंगना रणौतची पोस्ट चर्चेत, म्हणाली…

Lata Mangeshkar
“५० लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही,” जेव्हा दिवंगत लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्यास दिला होता नकार

कुणाच्याच लग्नात न गाणाऱ्या लता मंगेशकर यांनी ईशा अंबानींच्या लग्नासाठी पाठवलेली खास रेकॉर्डिंग

Radha Mangeshkar talks about mangeshkar Surname
“मला माझ्या आडनावाचा काहीच फायदा झाला नाही”, हृदयनाथ मंगेशकर यांच्या मुलीचे विधान; म्हणाल्या, “माझ्या बाबांनी…”

“मी तुला काही मदत करणार नाही,” असं राधा मंगेशकर यांना कोण म्हणालं होतं? जाणून घ्या

संबंधित बातम्या