लक्ष्मण हाके News

लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून ते धनगर समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे आहेत. २००३ साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पाच वर्ष नोकरीही केली. शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी उसतोडणी कामगार म्हणूनही काम केलं. त्यांच्या पत्नी विद्या हाके या सध्या पुण्याच्या व्हीआयटी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. लक्ष्मण हाके यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पुढे ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत माढा मतदारसंघातून धर्यैशील मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. लक्ष्मण हाके यांना जानेवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.


Read More
Mahavikas Agadi
Maharashtra News : महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होईल? जिंतेद्र आव्हाडांनी सांगितली तारीख

Marathi News Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचे प्रत्येक अपडेट जाणून घ्या, एका क्लिकवर…

Maratha protesters allege that OBC leader Laxman Hake consumed alcohol
Video: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप

पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी…

laxman hake criticized sharad pawar
Laxman Hake : “शरद पवार हे महाजातीयवादी नेते”, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांची टीका; म्हणाले, “पवार कुटुंबातील व्यक्ती…”

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे सध्या जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहे. दरम्यान, आज त्यांनी…

OBC Vs Maratha In Wadigodri
Maratha Vs OBC : जालन्यातल्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर, घोषणाबाजीनंतर तणावपूर्ण शांतता

वडीगोद्री आणि आंतरवली सराटी या दोन्ही ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे.

What Laxman Hake Said?
Laxman Hake : “राज ठाकरे तुम्ही खरोखरच प्रबोधनकारांच्या घराण्यात…”, लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांची राज ठाकरेंवर टीका, आरक्षणाच्या विचारांवर मला त्यांची कीव येते असंही लक्ष्मण हाके म्हणाले.

Maharashtra News Live Update in Marathi| Mumbai Pune Rain Live Updates
लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी ओबीसींबाबत भूमिका स्पष्ट करावी …अन्यथा समाज पराभूत करणार – लक्ष्मण हाके

अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

Laxman Hake On Manoj Jarange
Laxman Hake : “…तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा”, लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले?

लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंवर टीका केली होती, मात्र आज त्यांनी मनोज जरांगेंना खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

What Laxman Hake Said About Manoj Jarange?
Laxman Hake: “शरद पवार आणि मनोज जरांगेंची सेम लाईन, माझ्याकडून लिहून घ्या ते..”, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत निवडणुकीला सामोरं जाऊ असं म्हटलं आहे, त्यांच्या या निर्णयावर लक्ष्मण हाकेंनी टीका केली.

Laxman Hake On Manoj Jarange
Laxman Hake On Manoj Jarange : “मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना आणा”, लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

लक्ष्मण हाके यांनी आज जनआक्रोश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

ताज्या बातम्या