लक्ष्मण हाके Photos

लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून ते धनगर समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे आहेत. २००३ साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पाच वर्ष नोकरीही केली. शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी उसतोडणी कामगार म्हणूनही काम केलं. त्यांच्या पत्नी विद्या हाके या सध्या पुण्याच्या व्हीआयटी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. लक्ष्मण हाके यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला. पुढे ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत माढा मतदारसंघातून धर्यैशील मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. लक्ष्मण हाके यांना जानेवारी २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.


Read More

ताज्या बातम्या