लोकसभा पोल २०२४ News
लोकसभा (Loksabha)हे भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहामधील सदस्याचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो. लोकसभेतील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी नव्या सदस्यांची नियुक्ती होण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार दर पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. भारतात पहिल्यांदा १३ मे १९५२ रोजी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. २०१९ मध्ये सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या.
या निवडणुकांमध्ये भारतात भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. सत्तास्थापनानंतर भाजपाचे नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान झाले. या सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ हा १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे २०२४ साठी पुन्हा लोकसभा निवडणुकांचे आयोजन केले जाणार आहे.
साधारण एप्रिल-मे २०२४ या काळात निवडणुका असू शकतात असे म्हटले जात आहे. २०१४ पासून भाजपा लोकसभेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला. आता २०२४ मध्ये कोण लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read More