लखनऊ सुपर जायंट्स Videos

लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. आरपीएसजी ग्रुपच्या संजीव गोएंका यांच्याकडे लखनऊच्या संघाची मालकी आहे. २०२२ मध्ये पंधराव्या हंगामानिमित्त आणखी काही संघांचा समावेश आयपीएलमध्ये करण्यात यावा हा प्रस्ताव मांडण्यात आला. पुढे त्याला मान्यता मिळाली आणि आयपीएलमध्ये गुजरात आणि लखनऊ हे दोन संघ समाविष्ट करण्यात आले. २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये के.एल.राहुल बोली लावत व्यवस्थापनाने त्याला संघामध्ये घेतले.


पुढे त्यांच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. गतवर्षी या संघाने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चांगली खेळी केली होती. त्यानंतर संघाला महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला. असे असूनही लखनऊच्या संघाने प्लेऑफ्समध्ये जागा मिळवली. पण उपात्य फेरीमध्ये त्यांचा पराभव झाला. यंदाच्या सोळाव्या हंगामामध्ये हा संघ मागच्या वर्षीपेक्षा चांगली कामगिरी करण्यावर भर देणार आहे.


Read More