मध्य प्रदेश निवडणूक २०२३ Photos
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांची (Madhya Pradesh Election 2023) काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. तेथील विधानसभेची मुदत ६ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होत आहे. या निमित्ताने मध्य प्रदेश राज्यामध्ये मतदान केले जाणार आहे. सध्या त्या राज्यात सुमारे ५.६ कोटी मतदार आहेत असे म्हटले जात आहे. या राज्यातील एकूण २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या २३० जागांपैकी ३५ जागा अनुसूचित जाती आणि ४७ जागा अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधी/ उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मतदानाचा निकाल (Madhya Pradesh Assembly Election 2023 Result ) ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात येईल.
२०१८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी ११४ जागा कॉंग्रेस पक्षाकडे होत्या. तर १०९ जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले होते. बहुमत असूनही अपेक्षित जागा न मिळाल्याने कॉंग्रेसने चार अपक्ष पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले.
पण २०२० मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम म्हणत २२ आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार बरखास्त होऊन भाजपाकडे सत्ता आली. काही दिवसांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपा यांपैकी कोण सत्ता गाजवणार हे जानेवारी २०२४ मध्ये समजेल.
Read More