Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मध्य प्रदेश निवडणूक २०२३ Videos

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांची (Madhya Pradesh Election 2023) काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. तेथील विधानसभेची मुदत ६ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होत आहे. या निमित्ताने मध्य प्रदेश राज्यामध्ये मतदान केले जाणार आहे. सध्या त्या राज्यात सुमारे ५.६ कोटी मतदार आहेत असे म्हटले जात आहे. या राज्यातील एकूण २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या २३० जागांपैकी ३५ जागा अनुसूचित जाती आणि ४७ जागा अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधी/ उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मतदानाचा निकाल (Madhya Pradesh Assembly Election 2023 Result ) ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात येईल.


२०१८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी ११४ जागा कॉंग्रेस पक्षाकडे होत्या. तर १०९ जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले होते. बहुमत असूनही अपेक्षित जागा न मिळाल्याने कॉंग्रेसने चार अपक्ष पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले.


पण २०२० मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम म्हणत २२ आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार बरखास्त होऊन भाजपाकडे सत्ता आली. काही दिवसांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपा यांपैकी कोण सत्ता गाजवणार हे जानेवारी २०२४ मध्ये समजेल.


Read More
why no congress in north and no bjp in south explained by girish kuber
उत्तरेत काँग्रेस नाही, दक्षिणेत भाजपा नाही..पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांच्या मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालांवरून आता भविष्याबाबत अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.…

Why was Congress defeated in three states explained by Girish Kuber
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड निवडणूक निकालांचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

देशात चार राज्यांची मतमोजणी पार पडल्यानंतर त्यातील तेलंगणा वगळता इतर तिनही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यात काँग्रेसचा पराभव…

CM Shivraj Singh Chouhan
CM Shivraj Singh Chouhan on Results:”मध्यप्रदेशमध्ये भाजपाला बहुमत मिळणार”; शिवराज चौहानांचा विश्वास

पाच राज्यांच्या निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलं असून आता संपूर्ण देशाला या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार…