महाशिवरात्री २०२५ Videos

शिवशंकराच्या भक्तासाठी, शैव परंपरेतील अनुयायांसाठी महाशिवरात्र (Maha Shivratri) हा सण खूप महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. पण माघ महिन्यातील महाशिवरात्रीची माघ कृष्ण चतुर्दशी तिथी खास असते, या तिथीला महादेवांनी तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका आहे. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शंकराची आराधना करतात. पुढे दुसऱ्या दिवशी पूजा करुन मग उपवास सोडतात.


या तिथीला पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताचा लेप शिवलिंगावर लावतात. त्यासह धोत्रा, बेलाची पानेही वाहिली जातात. काही ठिकाणी प्रसाद म्हणून भांगचे सेवन केले जाते. २०२५ मध्ये हा सण २६ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे.


Read More
Crowd of devotees chaos at Ghrishneshwar temple ambadas danve gave a detail information
Ambadas Danve: भाविकांची गर्दी, घृष्णेश्वर मंदिरात गोंधळ; नेमकं काय घडलं?

महाशिवरात्रीनिमित्त बारावं ज्योतिर्लिंग असेलेल्या घृष्णेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. यावेळी व्हीआयपी रांगेतून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे…

Prajakta Mali will perform Shivarpanmastu dance on the occassion of Mahashivratri at Trimbakeshwar temple
Prajakta Mali: महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी करणार शिवार्पणमस्तु नृत्य; पण आक्षेप का?

Prajakta Mali Program at Trimbakeshwar Temple : फुलवंती, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या एका कार्यक्रमावर आता महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर…

Trustees of Trimbakeshwar temples protested against prajakta mali Sivaarpanastu dance at Trimbakeshwar temple
Prajakta Mali: “ही परंपरा चुकीची”; ललिता शिंदे यांची प्रतिक्रिया

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…