महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.
पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे. Read More
दहा वर्षांपूर्वी राज्यात अवघ्या तीन महिन्यात एक नाही तर तब्बल १९-२० वाघांची शिकार करणाऱ्या मध्यप्रदेशातील बहेलिया शिकाऱ्यांचा पुन्हा एकदा महाराष्ट्रात…
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने आतापर्यंत अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.