महाराष्ट्र करोना Photos

२०२० वर्ष हे करोना (Corona) महामारीमुळे नेहमीच लक्षात राहिलं. फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढायला लागली होती. महाराष्ट्र राज्यामध्ये ९ फेब्रुवारी २०२२ रोजी कोविड १९चा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत करोनाची लाट महाराष्ट्रभर पसरु लागली होती. केंद्र सरकारने भारतभर टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने समर्थन देत त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य केले. या काळामध्ये काही महिन्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शहरे करोनाची हॉटस्पॉट्स बनली होती. राज्य सरकारने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निरनिराळे उपाय केले.

आरोग्य व्यवस्था पूर्णपणे काम करत होती. या काळामध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे स्वत: सर्वत्र लक्ष देत होते. कालातंराने पहिली लाट ओसरली. त्यानंतर काही महिन्यामध्ये दुसऱ्या लाटेचे संकट महाराष्ट्रावर आले. यावेळेसही एकजूटीने या संकटाचा सामना केला. सर्वात उत्तमरित्या परिस्थिती हाताळलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश होता.
Read More