महाराष्ट्र दिन २०२४ News

१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. भाषावर प्रांत रचना कायदा लागू केल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्यनिर्मितीच्या या लढ्यामध्ये अनेक नागरिकांनी योगदान दिले. चळवळीदरम्यान १०६ हुतात्मांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराष्ट्राची निर्मिती व्हावी या उद्देशाने योगदान दिलेल्या हजारोंच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठीही महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
<br /> ब्रिटीशांचे भारतावर वर्चस्व असताना त्यांनी बंगाल प्रेसिडन्सी, मद्रास प्रेसिडन्सी आणि बॉम्बे प्रेसिडन्सी या तीन भागांमध्ये देशाचे विभाजन केले होते. यातील बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये आत्ताच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील बराचसा भाग येत होता. पुढे १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. पुढे १९५६ मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना कायद्यानुसार अनेक राज्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. पारतंत्र्यामध्ये असताना कॉंग्रेसद्वारे भाषावार प्रांत रचना हा मुद्दा मांडण्यात आला होता. या कायद्याला धरुन महाराष्ट्र एकीकरण आणि राज्यनिर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला.

तेव्हा बॉम्बे प्रेसिडन्सीचे प्रमुख केंद्र मुंबई शहर होते. मुंबईमध्ये मराठी, कोंकणी, गुजराती (कच्छी) लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. गुजराती लोकांनी स्वतंत्र राज्यांची मागणी केल्यानंतर महाराष्ट्रासाठीही जोरदार प्रयत्न होऊ लागले. पुढे याला आंदोलनाचे स्वरुप आले. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र व्हावे आणि मुंबई राज्याची राजधानी बनावी असे प्रस्ताव मांडले गेले. मुंबईत मराठी लोकांप्रमाणे गुजराती लोकसंख्या जास्त असल्याने मुंबई गुजरात राज्यामध्ये जावी किंवा ती स्वतंत्र राहावी असे गुजराती समूहाचे मत होते. या प्रकरणावरुन मुंबईसह महाराष्ट्रभर आंदोलन होऊ लागले.

पुढे २१ नोव्हेंबर १९५६ फ्लोरा फाउंटनच्या परिसरात मोठा जनसमूदाय महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी एकत्र आला होता. तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तेव्हाचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये १०६ हुतात्म्यांचा जीव गेला. यावरुन प्रकरण अधिकच तापले. सरकारविरोधात कारवायांचे प्रमाण वाढत गेले. काही महिन्यांनी सरकारने नमतं घेत भूमिका बदलली. गोळीबाराच्या प्रकरणानंतर चार वर्षांनी १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.
Read More
Maharashtra Day 2024 Celebration of cultural program with flag hoisting
औचित्य महाराष्ट्र दिनाचे… ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमधील विविध ठिकाणी ध्वजारोहण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

panvel marathi news, panvel woman violence marathi news
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना विविध पोलीस ठाण्यात दाखल

पहिल्या घटनेत शाळेच्या शिक्षिकेकडे बालिकेने सावत्र बापाकडून अत्याचार होत असल्याचे सांगितल्यावर घटनेला वाचा फुटली.

raj thackeray insta reel
राज ठाकरेंनी लाडक्या रीलस्टारबरोबर बनवलं पहिलं इन्स्टाग्राम रील, महाराष्ट्राला दिला खास संदेश

राज ठाकरे यांनी इन्टा रीलस्टार अथर्व सुदामे याच्याबरोबर एक रील तयार केलं असून या रीलद्वारे त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या…

sahyadri rock adventure foundation marathi news
समुद्रालगतच्या १०० फूट उंच सुया सुळक्यावरून राज्याला मानवंदना

कल्याण येथील सह्याद्री रॉक ऍडवेंचर ही गिर्यारोहन संस्था आहे. या संस्थेतील गिर्यारोहक साहसी कामगिरी करत विक्रम करत असतात.

Maharashtra Din 2024 Wishes in Marathi
Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा पाठवून गाऊ गाथा गौरवाची, पाहा शुभेच्छापत्रांची यादी

Maharashtra Din 2024 Wishes : महाराष्ट्र दिन विशेष मराठी शुभेच्छापत्र आपण मोफत डाऊनलोड करून शेअर करू शकता. तुमच्या मित्रमंडळींना, कुटुंबाला,…

Marathwada Corruption in irrigation sector in Maharashtra Water shortage Maharashtra Day 2024
मराठवाडा: होय, आम्ही पैसे पाण्यात घालतो!

भर दुपारी एका बैलगाडीत महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे सिंचन आयोगाच्या कार्यालयाकडे…

North Maharashtra Tribal farmers questions Maharashtra Day 2024
उत्तर महाराष्ट्र: शेती आहे, उद्योग आहेत, पण..

काही वर्षांपूर्वी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील काही अर्थतज्ज्ञ महाराष्ट्रातील  ग्रामीण अर्थकारणाचा अभ्यास करण्यासाठी आले होते.

Mumbai Maharashtra Day 2024 Mumbai wants more autonomy
मुंबई: मुंबईला हवी अधिक स्वायत्तता !

या आठवडय़ात येऊ घातलेला महाराष्ट्रदिन (१ मे) हा महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील, पुरोगामी राज्यासाठी महत्त्वाचा दिवस. तो दरवर्षी मोठय़ा धूमधडय़ाक्याने साजरा होतो.