१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
पंकजा मुंडे यांच्या १५ वर्षांच्या राजकीय कारकार्दीमध्ये अनेक राजकीय चढउतार अनुभवणाऱ्या पंकजा मुंडे या ओबीसी बांधणीतील महत्त्वाच्या नेत्या असल्याचा संदेश…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यात दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन…