महाराष्ट्र सरकार Photos

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
Government Formation Maharashtra Chief Minister Salary
15 Photos
Maharashtra CM Salary: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मिळणार प्रतिमहिना इतका पगार? अन् ‘या’ सुविधांचा लाभ

भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता असून त्या वेळी फडणवीस यांच्या नावाची घोषणा होईल.

Maharashtra assembly results 2024 women winner candidates and there constituencys
24 Photos
महाराष्ट्रातील ‘या’ २१ मतदारसंघांचे प्रतिनिधित्व महिला आमदारांच्या हाती

Maharashtra Assembly Results 2024 : राज्यामध्ये २१ मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. कोणते आहेत हे मतदारसंघ ज्यांचे नेतृत्व आता…

Maharashtra Vidhan Sabha 2024 MLA Education
15 Photos
Maharashtra Assembly Election Results: महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण माहिती आहे का?

या साऱ्या घडामोडींनुसार देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Result Brother Sister Pair
10 Photos
Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या विधानसभेत दिसाणार भावांच्या तीन जोड्या; बहीणभावाचीही एक जोडी

शनिवारी लागलेल्या विधानसभा निवडणूक निकालांत निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी ६० पेक्षा अधिक जण हे कोणत्या ना कोणत्या राजकीय घराण्याशी संबंधित…

Manoj Jarange Patil
6 Photos
उपोषणाला १२ दिवस, पण सरकारनं अद्यापही ‘या’ मागणी मान्य केल्या नाहीत; जरांगे-पाटलांनी यादीच वाचली

सरकारने मागण्या मान्य न केल्याने जरांगे-पाटील यांनी उपोषण चालूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

15 Photos
Photos: “आजही माझ्या मनात शरद पवारांविषयी प्रेम, पण त्यांनी…”, त्या घटनेचा उल्लेख करत छगन भुजबळांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गटांकडून मुंबईत अधिकृत बैठका होत आहेत.

Shinde fadnavis and AjitPawar new
15 Photos
PHOTOS : “राजकीय विरोधक आहेत म्हणून संपवण्याचा प्रयत्न जर कोणी करू पाहत असेल, तर… ” अजित पवारांचा इशारा!

“लोकांनाही कळतं की कशा पद्धतीने गोवण्यात येतय, काय करण्यात येतय?” असंही म्हणाले आहेत.

Uddhav Thakrey and Modi
12 Photos
PHOTOS : “जर हिंमत असेल तर जाहीर करा की या देशातली लोकशाही संपली आहे” – उद्धव ठाकरेंचं मोदी सरकारवर टीकास्र!

“आता तुम्ही दिलेलं मत कुठे जाणार आणि कुठून कुठून जाणार, हे तुम्हाला तरी कळतं का?” असं म्हणत शिंदे गटावरही निशाणा…

Raj Thakrey and Bommai
15 Photos
PHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा!

पाहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज ठाकरेंनी आणखी सुनावलं आहे.