महाराष्ट्र पोलिस

महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करते. राज्याच्या गृह मंत्रायलामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा समावेश होतो. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक आहे. यामध्ये एकूण १२ पोलीस आयुक्तालये आणि २३ जिल्हा पोलीस घटक आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड आणि वसई विरार या दोन आयुक्तालयांचादेखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये २ लाखांपर्यंतचे मनुष्यबळ आहे. मुंबईमध्ये या दलाचे मुख्यालय आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केली जाते. शिपाई तसेच अन्य पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया ठराविक कालावधीनंतर राबवण्यात येते. या संबंधित माहिती पोलीस दलाद्वारे प्रसिद्ध केली जाते. रजनीश सेठ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अनेक विभाग आहेत. मुंबईवर पोर्तुगीजांचे राज्य असताना पहिल्यांदा पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. पुढे या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. तेव्हा बॉम्बे प्रांतासाठी बॉम्बे पोलीस दल कार्यरत होते. पुढे १९४७ नंतर बॉम्बे प्रांताचे विभाजन होत राज्यांची निर्मिती होत गेली. तेव्हा बॉम्बे पोलीस दल महाराष्ट्र पोलीस, गुजरात पोलीस आणि म्हैसूर पोलीस (कर्नाटक पोलीस) या तीन दलांमध्ये विभागले गेले. महाराष्ट्र पोलीस खात्यामधील मुंबई पोलीस दल हे स्कॉटलंड यार्डनंतर जगातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक आहे असे मानले जाते. Read More
best investigation police officer honored
सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलिसांचा सन्मान; शस्त्रसाठी जप्ती, मोबाईल नेटवर्कचा तपास सर्वोत्कृष्ट

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घातपात घडविण्यासाठी रचण्यात आलेला कट गुन्हे शाखा २ च्या पथकाने उधळून लावला होता.

Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

देशभरात महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण केवळ ३६.६ टक्के आहे. हेच प्रमाण महाराष्ट्रात ३४.३ टक्के आहे.

Mumbai police arrest four Lawrence Bishnoi gang members
लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित चौघे जण ताब्यात; मुंबई पोलिसांकडून कर्वेनगर भागात कारवाई

बिष्णोई टोळीने शहरातील एका सराफी पेढीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,

raj thackeray question to thane police over bail to accused in molestation case
विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मिळतो कसा? राज ठाकरे यांचा ठाणे पोलिसांना प्रश्न

आरोपीविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्याप्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.

heavy police security in mumbai for dussehra and devi idol immersion
मुंबईत दसरा मेळावा आणि देवी विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १५ हजार पोलीस तैनात

मध्य प्रादेशिक परिमंडळातील पोलिसांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे.

challenges ahead Mumbai police
आमची दैना पोलिसांची व्यथा; अनिश्चित कर्तव्याच्या कालावधीचा मुद्दा ऐरणीवर…

अन्य सरकारी कार्यालयांप्रमाणे पोलिसांच्या कर्तव्याचा कालावधी आठ तास करावा, अशी मागणी २०१६ मध्ये सर्वप्रथम झाली होती.

policemen suspended for remain absent at duty point in rbi headquarters
आरबीआय मुख्यालयात बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर राहणं भोवलं, १२ पोलिसांचं निलंबन

पोलीस न सांगता गैरहजर असल्याची गंभीर बाब समजल्यानंतर ताडदेव येथील सशस्त्र विभागातील अधिकाऱ्याने सखोल चौकशी केली.

Mumbai Police Win Hearts Viral Video Showcases Their Dedication to Maintaining Law and Order During Ganesh Utsav
“ना कुठलं मंडळ, ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता, जिथे बंदोबस्त तिथेच सुखकर्ता दुःखहर्ता!”, महाराष्ट्र पोलिसांचा Video Viral

सध्या गणेशोत्सवादरम्यान कार्यरत मुंबई पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Mumbai Police suspended four officers from Khar police station after a CCTV video surfaced showing them allegedly planting drugs on a suspect before arresting him
Mumbai Police Drugs Case: गोठ्यात रचला ड्रग्सचा सापळा; मुंबई पोलिसांचं कृत्य CCTV मध्ये कैद

मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम चार पोलिसांनी केलं आहे. या चारजणांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हवालदार ( Mumbai…

High Court questions state police on crimes against women Mumbai
जनक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्हे गांभीर्याने घेणार नाही का? उच्च न्यायालयाचा राज्य पोलिसांना संतप्त प्रश्न

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाच्या ढिसाळ तपासावर ताशेरे ओढताना उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य पोलिसांना धारेवर धरले.

संबंधित बातम्या