महाराष्ट्र पोलिस Videos
महाराष्ट्र पोलीस दल हे महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करते. राज्याच्या गृह मंत्रायलामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचा समावेश होतो. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक आहे. यामध्ये एकूण १२ पोलीस आयुक्तालये आणि २३ जिल्हा पोलीस घटक आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड आणि वसई विरार या दोन आयुक्तालयांचादेखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये २ लाखांपर्यंतचे मनुष्यबळ आहे. मुंबईमध्ये या दलाचे मुख्यालय आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवड संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत केली जाते. शिपाई तसेच अन्य पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया ठराविक कालावधीनंतर राबवण्यात येते. या संबंधित माहिती पोलीस दलाद्वारे प्रसिद्ध केली जाते. रजनीश सेठ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अनेक विभाग आहेत. मुंबईवर पोर्तुगीजांचे राज्य असताना पहिल्यांदा पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. पुढे या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. तेव्हा बॉम्बे प्रांतासाठी बॉम्बे पोलीस दल कार्यरत होते. पुढे १९४७ नंतर बॉम्बे प्रांताचे विभाजन होत राज्यांची निर्मिती होत गेली. तेव्हा बॉम्बे पोलीस दल महाराष्ट्र पोलीस, गुजरात पोलीस आणि म्हैसूर पोलीस (कर्नाटक पोलीस) या तीन दलांमध्ये विभागले गेले. महाराष्ट्र पोलीस खात्यामधील मुंबई पोलीस दल हे स्कॉटलंड यार्डनंतर जगातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक आहे असे मानले जाते. Read More