महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.
काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही. Read More
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभरापूर्वी विधानसभेत…