Associate Sponsors
SBI

महाराष्ट्र पॉलिटिक्स News

महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही.
Read More
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray in MArathi
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; संभाव्य युतीच्या चर्चेबाबत मुनगंटीवार म्हणाले, “नाशिकमध्ये जेव्हा…”

Devendra Fadnavis Raj Thackeray Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.

मंत्रालयात फेस स्कॅन यंत्रणा बसवण्यामागचं कारण काय? त्यामुळे काय बदल होणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Mumbai Mantralaya : मंत्रालयात फेस स्कॅन यंत्रणा बसवण्यामागचं कारण काय? त्यामुळे काय बदल होणार? फ्रीमियम स्टोरी

Mantralaya Facial Recognition : चेहरा पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने असा निर्णय का घेतला?

कोण आहेत प्रताप सरनाईक; मुख्यमंत्र्यांनी शिवसेना शिंदे गटाचे पंख छाटले का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी? कोण आहेत प्रताप सरनाईक? फ्रीमियम स्टोरी

Shivsena Pratap Sarnaik vs BJP : मी परिवहन विभागाचा मंत्री असल्याने एसटी महामंडळाचे सर्व निर्णय माझ्यामार्फतच घेतले जातील, असं सरनाईक…

नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?

Namdev Shastri Kirtan News : धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवान गड भक्कमपणे उभा आहे, असं महंत नामदेव महाराज शास्त्री म्हणाले…

शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विखे-पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : शिर्डीतल्या एकाच इमारतीत ७ हजार मतदार वाढले? काँग्रेसच्या आरोपात किती तथ्य? फ्रीमियम स्टोरी

Shirdi Vidhan Sabha Voters : लोकसभा निवडणुकीनंतर शिर्डीतील एका इमारतीच्या पत्त्यावर सुमारे सात हजार मतदारांची नोंदणी झाली, असा काँग्रेस नेते…

Devendra Fadnavis
Maharashtra News Updates : आष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार भाषण, सुरेश धस यांना दिली भगीरथाची उपमा

Mumbai News Update Today : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर, यासह महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

rahul solapurkar on chhatrapati shivaji maharaj
Rahul Solapurkar: छत्रपती शिवरायांबाबतच्या ‘त्या’ विधानावर राहुल सोलापूरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “लाच हा शब्द…”

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ‘लाच’ हा शब्द वापरल्यावरून राहुल सोलापूरकर टीकेच्या केंद्रस्थानी आले होते. त्या विधानावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!

‘पॉलिटिकल एक्स्टॉर्शन’च्या मुद्द्यावर विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी “कुणालाही राजकीय आशीर्वाद मिळणार नाही”, असं स्पष्ट केलं आहे.