महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. या निवडणुकीबद्दलची अधिसूचना २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यानुसार १५व्या विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे.


यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, प्रकाश आंबेडकारांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह इतरही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.


Read More
Assembly  election 2024 Who benefits from the high turnout in the Maval Assembly Constituency polls Pune print news
मावळमध्ये मतदानाचा उच्चांक कोणाला मारक?

मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी चुरस होती. वडगाव, तळेगाव दाभाडे, लोणावळा या शहरी भागात सकाळच्या टप्प्यात जास्त मतदान झाले.

assembly election 2024 wardha BJP MLA Dadarao Ketche accused of doing work against party
भाजप आमदार दादाराव केचेंवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ? पण, केचे म्हणतात…

उमेदवारी न दिल्याचा राग दादाराव केचे यांनी काढलाच, असा आरोप सुरू झाला आहे. केचे यांनी आर्वीतील देवेंद्र फडणवीस यांची सभा…

Assembly election 2024 Village voting in Bhosari assembly constituency decisive Pune news
भोसरीत समाविष्ट गावातील कौल निर्णायक?

भोसरी विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदान झाले. समाविष्ट भागातील चऱ्होली, मोशी, चिखली, दिघी, बोऱ्हाडेवाडी केंद्रावर सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले.

election process in eight assembly constituencies in Pune complete peacefully
मतदानातही पुणेकरांचे ‘एक ते चार’! प्रक्रिया शांततेत, टक्का वाढविण्यासाठीच्या प्रयत्नांत कसूर नाही

अपवाद वगळता पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली

Maharashtra Assembly Elections 2024 Exit Poll Result
एक्झिट पोल खरे ठरतील का? २०१९ मधील अंदाज किती अचूक होते? जाणून घ्या दोन्ही निवडणूक निकालांची स्थिती

Maharashtra Assembly Elections 2024 Exit Poll : २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने १०५ जागा जिंकल्या होत्या.

Mumbai Voter Turnout : विधानसभा निवडणुकीत यंदा बोरीवलीत सर्वाधिक मतदान तर ‘या’ मतदारसंघाने पुन्हा केलं निराश; पाहा आकडेवारी

मुंबई शहर आणि उपनगर भागात विधानसभेसाठी राज्याच्या सरासरीच्या तुलनेत कमी मतदान झाले.

Praniti shinde solapur
Maharashtra Assembly Election 2024 Live: “गद्दार प्रणिती शिंदेंचा धिक्कार असो..”, शिवसेना ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: विधानसभा निवडणूक आणि इतर राजकीय घडामोडींची माहिती मिळवा एका क्लिकवर

Assembly election 2024 Pimpri Assembly Constituency  Voters in the last phase are decisive Pune print news
पिंपरीतील शेवटच्या टप्प्यातील मतदार कोणाला धक्का देणार?

चिंचवड आणि भोसरी मतदारसंघांत सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसत असताना दुसरीकडे झोपडपट्टीबहुल असलेल्या पिंपरी मतदारसंघात मतदारांमध्ये मात्र निरुत्साह दिसला.

Assembly Elections 2024 Chinchwad Assembly Constituency Increased turnout decisive pune news
चिंचवडमध्ये वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर?

राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरातील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद…

Maharashtra assembly election 2024 exit polls analysis by girish kuber
शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढलेलं मतदान, ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा; कोणते मुद्दे ठरणार निर्णायक?

शिवसेनेचे दोन गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट यांची मतं वाढल्यास राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक…

Parvati Assembly Constituency Assembly Election 2024 Who will support the seniors along with the new voters Who will be decisive Pune print news
पर्वतीत नवमतदारांसोबत ज्येष्ठांची साथ कुणाला.. कोण ठरणार निर्णायक ?

पर्वती विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. सकाळी नऊनंतर मतदान केंद्रावरील…

sanjay raut criticized mahayuti press conference Live Maharashtra Election 2024
Sanjay Raut Live: संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल; पत्रकार परिषद Live | Maharashtra Election 2024

Maharashtra Election 2024: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत संजय…

संबंधित बातम्या