महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ Photos
महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी झारखंडसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. या निवडणुकीबद्दलची अधिसूचना २९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यानुसार १५व्या विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडेल, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत आहे.
यासोबतच या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, प्रकाश आंबेडकारांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासोबतच संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासह इतरही काही लहान पक्ष आणि अपक्ष विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत पडलेली फूट आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असून या निवडणुकीत जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read More