हिंदू दिनदर्शिकेमधील पौष महिन्यामध्ये मकर संक्रात हा सण येतो. मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. मकर संक्रातीला तीळगूळ प्रामुख्याने खाल्ले जातात. तेव्हा स्नेही, मित्रपरिवारामध्ये तीळ गूळ घ्या आणि गोड बोला असे म्हटले जाते. तीळामध्ये उष्णता असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी हा पदार्थ खाल्ला जातो अशी मान्यता आहे. याच काळामध्ये धान्य घरामध्ये आलेले असते.
पूर्वीच्या काळी बायका हळद-कुंकूचे कार्यक्रम आयोजित करत धान्याचे वाण एकमेकांनी देत असतं. हळद-कुंकूची प्रथा अजूनही टिकून आहे. या सणाच्या दिवशी काळे कपडे घातले जातात. यामागे सूर्याची किरणे काळ्या रंगाने अवशोषित होतात आणि गारव्यापासून रक्षण होते असे कारण सांगितले जाते. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी या दोन दिवसांपैकी एका दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. Read More
16th January Kinkrant Marathi Horoscope: १६ जानेवारीला म्हणजेच किंक्रांतीच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या मंडळींना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल…