मकर संक्राती २०२५ Photos

हिंदू दिनदर्शिकेमधील पौष महिन्यामध्ये मकर संक्रात हा सण येतो. मकरसंक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. मकर संक्रातीला तीळगूळ प्रामुख्याने खाल्ले जातात. तेव्हा स्नेही, मित्रपरिवारामध्ये तीळ गूळ घ्या आणि गोड बोला असे म्हटले जाते. तीळामध्ये उष्णता असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी हा पदार्थ खाल्ला जातो अशी मान्यता आहे. याच काळामध्ये धान्य घरामध्ये आलेले असते.

पूर्वीच्या काळी बायका हळद-कुंकूचे कार्यक्रम आयोजित करत धान्याचे वाण एकमेकांनी देत असतं. हळद-कुंकूची प्रथा अजूनही टिकून आहे. या सणाच्या दिवशी काळे कपडे घातले जातात. यामागे सूर्याची किरणे काळ्या रंगाने अवशोषित होतात आणि गारव्यापासून रक्षण होते असे कारण सांगितले जाते. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी या दोन दिवसांपैकी एका दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो.
Read More
How To Make Bhoplyache gharge Recipe
9 Photos
Makar Sankranti 2025: ‘भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या’ कधी खाल्ल्या आहेत का? मग यंदा मकरसंक्रातीला नक्की बनवा; वाचा सोपी रेसिपी

Bhoplyachya Gharya : यावर्षी तुम्हाला मकरसंक्रांतीला एखादा वेगळा पदार्थ करून पाहायचा असेल तर तुम्ही ‘भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या’ बनवू शकता…

How To Make makar sankranti special Tilache Ladoo
9 Photos
Tilache Ladoo Recipe: संक्रांतीला तिळाचे लाडू करताना लक्षात ठेवा ‘ही’ १ टिप; कडक होणार नाहीत लाडू; वाचा सोपी रेसिपी

How To Make Tilache Ladoo : आज आपण मकर संक्रांतीनिमित्त अर्धा किलो तिळाचे लाडू बनवण्याची कृती पाहणार आहोत. तसेच हे…

Makar Sankranti 2024 Marathi Actress Wishes
14 Photos
Makar Sankranti 2024: ‘या’ मराठी अभिनेत्रींनी चाहत्यांना दिल्या मकर संक्रांतीच्या खास शुभेच्छा

लोकसत्ताच्या सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…. तिळगूळ घ्या गोड गोड बोला…

Prime Minister Narendra Modi feeds cows at his residence on Makar Sankranti
12 Photos
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाईला चारा खाऊ घालून, अनोख्या शैलीत साजरा केला मकर संक्रांतीचा सण

मकर संक्रांत २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी गायींना चारा दिला आणि त्यांची देखभाल केली.

ताज्या बातम्या