मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला.


२००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress)समिती प्रमुख होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. तर कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते.


जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले.


Read More
तेजस्वी यादव अ‍ॅक्शन मोडमध्ये, बिहार निवडणुकीसाठी स्थापन केली समन्वय समिती

समन्वय समिती निवडणुकीपूर्वी जागावाटप, प्रचाराचे मुद्दे आणि संयुक्त मोहिमा यांसह अनेक पैलूंवर चर्चा करेल. तेजस्वी यादव हे या समितीचे नेतृत्व…

Mallikarjun kharge deoli mandir
काँग्रेस अधिवेशनात देवळीची मंदिर घटना ? अध्यक्ष खरगेंचे वक्तव्य आणि व्हायरल होतेय…

अध्यक्ष खरगे यांनी भाषणातून नमूद केले की राम नवमीस एका नेत्याने मंदिरात प्रवेश घेतला. त्यानंतर ते मंदिर अपवित्र झाले म्हणून…

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : “जग मतपत्रिकेवर परतलं, तरी आपण…”, खरगेंची मोदी सरकारवर टीका; महाराष्ट्राच्या निवडणुकीचा दाखला देत म्हणाले…

Mallikarjun Kharge on EVM : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरादर हल्लाबोल केला.

Jagdeep dhankhar ask mallikarjun kharge about his throat
Video: “खरगेजी, घसा चांगला राहण्यासाठी काय घेता?” राज्यसभेत जगदीप धनखड यांच्या मिश्किल प्रश्नावर सभागृहात पिकला हशा!

Jagdeep dhankhar and mallikarjun kharge | जगदीप धनखड आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभेतील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

Rijiju vs Kharge controversy in parliament
रिजिजू-खरगे यांच्यात खडाजंगी; सप खासदारांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संसदेत रणकंदन

सुमन यांच्या माफीच्या मागणीवरून भाजपच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने सभागृह तहकूब करावे लागले.

Rajya Sabha adjourned
Muslim reservation : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शाब्दिक चकमक

राज्यसभेत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ, काय काय घडलं जाणून घ्या.

Mallikarjun Kharge initiative
दोनशेवर जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या मुख्यालयात, राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीस हजर राहण्याची प्रदेशाध्यक्षांची तंबी

टप्प्याटप्प्याने राज्यनिहाय अश्या बैठकी होणार. ३ एप्रिलला दुपारी ३ वाजता दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या इंदिरा भवन या मुख्यालयात येथे…

वंचितांना नेतृत्व देण्याचा काँग्रेसचा उत्तर प्रदेशात प्रयत्न मात्र तरीही नाराजी का?

नवीन नियुक्त्या झाल्यामुळे काँग्रेस दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिमांचं प्रतिनिधित्व आणखी ताकदीनिशी करू शकते. मात्र या नियुक्त्यांनंतरही उत्तर प्रदेशमधील सामाजिक समीकरणांचं…

mallikarjun kharge statement
दुसऱ्या दिवशीही गदारोळ, ‘एनईपी’वरून विरोधक आक्रमक; खरगेंच्या वक्तव्यावरून वाद

राज्यसभेत केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणावर अल्पकालीन चर्चा आयोजित केली होती. त्याआधी द्रमुकचे सदस्य केंद्र सरकारच्या तीन भाषेच्या सक्तीची निषेध करत…

Congrss
Congress : काँग्रेस कात टाकणार? ‘या’ राज्यातील सरचिटणीस आणि प्रभारी बदलले; नियुक्त्यांवर राहुल गांधींची छाप

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले जात आहेत.

president rule in Manipur
भाजपमधील अंतर्गत वादाने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट, काँग्रेसचा आरोप

राज्यात आजवर झालेल्या हिंसाचारात २५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ २०२७ पर्यंत आहे.

Harshvardhan Sapkal appointed as the new Maharashtra Congress state president by Mallikarjun Kharge.
Harshvardhan Sapkal: राहुल गांधींशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

Harshvardhan Sapkal: आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ…

संबंधित बातम्या