scorecardresearch

मल्लिकार्जुन खरगे News

काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला.


२००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress)समिती प्रमुख होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. तर कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते.


जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले.


Read More
Mallikarjun Kharge Rahul Gandhi PTI
ऑपरेशन सिंदूरला ‘छोटंसं युद्ध’ म्हणत काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “सरकार पर्यटकांना वाचवू शकलं असतं”

Mallikarjun Kharge on Operation Sindoor : मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “मला माहिती मिळाली आहे की हल्ल्याच्या तीन दिवस आधी मोदी यांना…

Mallikarjun Kharge Narendra Modi
“मोदींनी १५१ परदेश दौरे केले, पण एकही देश भारताबरोबर उभा राहिला नाही”, परराष्ट्र धोरणावरून खर्गेंचा टोला

Mallikarjun Kharge on Narendra Modi : मल्लिकार्जुन खर्गे म्हहणाले, “सरकारने पर्यटन स्थळी सुरक्षा पुरवली असती तर इतक्या लोकांचा बळी गेला…

शरद पवारांच्या मनात नक्की काय? पुन्हा विरोधी मित्रपक्षांपेक्षा वेगळ्या भूमिकेत पवार

लोकशाहीच्या मंदिरातून आपला एकतेचा आवाज घुमला पाहिजे. काश्मीरवर मध्यस्थीच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर विरोधक नाराज आहेत. तसेच संसदेने पुन्हा एकदा स्पष्ट करावे…

ऑपरेशन सिंदूर, शस्त्रविरामाच्या मुद्द्यावरून विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी, पंतप्रधानांना लिहिले पत्र

Opposition on Op Sindoor, ceasefire: सद्यस्थितीत ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती पत्रातून…

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge
पाकिस्तानविरोधातील Operation Sindoor वर काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका; मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “इतिहास साक्ष आहे…”

Congress on India Airstrike Operation Sindoor : भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईवर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे.

Congress chief Mallikarjun Kharge and PM Narendra Modi
Mallikarjun Kharge: पहलगाम हल्ल्याची आधीच माहिती होती? पंतप्रधान मोदींनी दौरा रद्द केला; मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

Mallikarjun Kharge on Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर संस्थेकडून मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्वतःचा…

All Party Meeting
दहशतवादाविरुद्ध सरकारच्या कारवाईला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा, सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटींवरही ठेवलं बोट

Pahalgam Terror Attack : सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “अशा बैठकीला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे…

तेजस्वी यादव अ‍ॅक्शन मोडमध्ये, बिहार निवडणुकीसाठी स्थापन केली समन्वय समिती

समन्वय समिती निवडणुकीपूर्वी जागावाटप, प्रचाराचे मुद्दे आणि संयुक्त मोहिमा यांसह अनेक पैलूंवर चर्चा करेल. तेजस्वी यादव हे या समितीचे नेतृत्व…

Mallikarjun kharge deoli mandir
काँग्रेस अधिवेशनात देवळीची मंदिर घटना ? अध्यक्ष खरगेंचे वक्तव्य आणि व्हायरल होतेय…

अध्यक्ष खरगे यांनी भाषणातून नमूद केले की राम नवमीस एका नेत्याने मंदिरात प्रवेश घेतला. त्यानंतर ते मंदिर अपवित्र झाले म्हणून…

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : “जग मतपत्रिकेवर परतलं, तरी आपण…”, खरगेंची मोदी सरकारवर टीका; महाराष्ट्राच्या निवडणुकीचा दाखला देत म्हणाले…

Mallikarjun Kharge on EVM : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरादर हल्लाबोल केला.

Jagdeep dhankhar ask mallikarjun kharge about his throat
Video: “खरगेजी, घसा चांगला राहण्यासाठी काय घेता?” राज्यसभेत जगदीप धनखड यांच्या मिश्किल प्रश्नावर सभागृहात पिकला हशा!

Jagdeep dhankhar and mallikarjun kharge | जगदीप धनखड आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभेतील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

Rijiju vs Kharge controversy in parliament
रिजिजू-खरगे यांच्यात खडाजंगी; सप खासदारांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संसदेत रणकंदन

सुमन यांच्या माफीच्या मागणीवरून भाजपच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने सभागृह तहकूब करावे लागले.

ताज्या बातम्या