मल्लिकार्जुन खरगे Photos

काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला.


२००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress)समिती प्रमुख होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. तर कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते.


जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले.


Read More
mahavikas aghadi release manifesto
10 Photos
MVA Manifesto : भाजपा पाठोपाठ महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित, केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.

Congress and national conferance allience
15 Photos
जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीआधी नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसमध्ये हातमिळवणी, आघाडीच्या घोषणेनंतर काय म्हणाले नेते?

Congress and national conference alliance: जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत.

mva melava 2024
11 Photos
“मोदी शाहांच्या हाती महाराष्ट्र देऊ नका”, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे आवाहन, सद्भावना मेळाव्यात ठाकरे- पवार काय म्हणाले?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसने आयोजित केलेल्या सद्भावना मेळाव्यात खरगे यांनी भाजपवर टीका केली.

Uddhav thackeray meets rahul gandhi at delhi
9 Photos
शिवसेना उबाठाची दिल्लीवारी; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट…

7th phase election campaion off partys
10 Photos
लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी प्रचाराचा धडाका: पुढाऱ्यांनी काय केलीय तयारी; कोण कुठे घेणार सभा?

देशामध्ये शेवटच्या टप्प्याचे मतदान शिल्लक आहे, त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारसभांचे नियोजन केले आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

congress on pm modi
9 Photos
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘त्या’ विधानावरुन काँग्रेसचे प्रत्त्युत्तर, निवडणूक आयोगात तक्रार; भाजपावर चौफेर हल्ला

पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर..

narendra modi and m kharge
10 Photos
Loksabha Election 2024 : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भाजपावर टीका; म्हणाले “मोदी सरकार दलित..”

नागपूर गोळीबार चौक येथे खरगे यांची सभा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

opposition leaders meeting
13 Photos
Photos : “पाटण्यातून सुरू होणारं जनआंदोलन बनतं”, विरोधकांच्या ऐक्याला बिहारमधून बळकटी; कोण काय म्हणालं वाचा!

बिहारमध्ये विरोधकांची बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत सर्व नेत्यांनी त्यांचे मते मांडली आहेत.

mallikarjun kharge property
15 Photos
Photos : कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधींपेक्षाही श्रीमंत, मल्लिकार्जुन खरगेंची एकूण संपत्ती माहिती आहे?

कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची एकूण संपत्ती, नेट वर्थ यावर एक नजर टाकूया.

Mallikarjun Kharge
9 Photos
Photos : खरगेंचा अध्यक्षपदापर्यंतचा संघर्ष; ७ व्या वर्षी आईला गमावले, विद्यार्थीदशेत राजकारणाला सुरुवात, ९ वेळा आमदार अन्…

Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा काँग्रेस अध्यक्षपदापर्यंतचा संघर्ष सोप्पा नव्हता.

ताज्या बातम्या