मल्लिकार्जुन खरगे Videos

काँग्रेसला मागील अडीच दशकांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील लाभलेले अध्यक्ष म्हणजे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Karge) हे आहेत. तब्बल २४ वर्षांनी काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभला आहे. कर्नाटकचे असलेले ऐंशी वर्षीय मापण्णा मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले खरगे हे एस. निजलिंगप्पा यांच्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनणारे कर्नाटकातील दुसरे नेते आणि जगजीवन राम यांच्यानंतर या पदाचा सन्मान मिळणारे दुसरे दलित नेते आहेत. वारावट्टी (बिदर) येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या खरगे यांनी शालेय शिक्षणानंतर कलबुर्गी येथे पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी ते वकिली पेशात होते. ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या खरगे यांच्या राजकीय प्रवासात चढ-उतार आहेत. गुलबर्गा (कलबुर्गी) येथून केंद्रीय नेतृत्वपदापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास केला.


२००८ च्या विधानसभा निवडणुकीत खरगे कर्नाटक प्रदेश काँग्रेस (Congress)समिती प्रमुख होते, त्याशिवाय कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली होती. २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते. मनमोहन सिंग सरकारमध्ये खरगे यांच्याकडे केंद्रीय मंत्री म्हणून कामगार आणि रोजगार, रेल्वे व सामाजिक न्याय ही खाती होती. तर कर्नाटकात एस. एम. कृष्णा मुख्यमंत्री असताना खरगे राज्याचे गृहमंत्री होते.


जून २०२० मध्ये, खरगे यांची कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली व काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यापूर्वी ते राज्यसभेतील १७ वे विरोधी पक्षनेते ठरले.


Read More
Rahul Gandhis 54th birthday celebration at party office in Delhi Mallikarjun Kharge and other leaders present
दिल्लीत पक्ष कार्यालयात राहुल गांधींचा ५४वा वाढदिवस साजरा, मल्लिकार्जुन खरगेंसह अन्य नेते उपस्थित

दिल्लीत पक्ष कार्यालयात राहुल गांधींचा ५४वा वाढदिवस साजरा, मल्लिकार्जुन खरगेंसह अन्य नेते उपस्थित

We Will Take The Right Steps At The Right Time Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge: इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात..

‘एनडीए’तील प्रमुख घटक पक्षांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी लेखी पाठिंबा दिल्यामुळे केंद्रात ‘इंडिया’ आघाडीच्या सरकारची शक्यता मावळू लागल्याचं बुधवारी (५ जून)…

Lok Sabha in Delhi meeting information given by Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge on Loksabha: दिल्लीतील बैठकीत लोकसभेचा आढावा, मल्लिकार्जून खरगेंनी दिली माहिती

येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक आज (१ जून) दिल्लीत पार…

prakash ambedkar has expalined about the letter written to mallikarjun kharge for loksabha election
Prakash Ambedkar | ठाकरे, पवारांना डावलून काँग्रेसला पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी मांडली भूमिका

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. अशातच वंचितने आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद…

ताज्या बातम्या