तसं तर निवडणूक आयोगाने अद्याप हे दोन्ही डेटाबेस लिंक केलेले नाहीत. मतदार याद्यांमधील बनावट नावं बाजूला करून नव्याने याद्या तयार करण्यासाठी आधार जोडण्याचा मुद्दा विचारात होता. असं असतानाही मतदारांसाठी आधार-EPIC लिकिंग अनिवार्य केलेले नाही.
पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यास विधानसभेतून तृणमूल काँग्रेसच्या सर्व मुस्लीम आमदारांना बाहेर काढले जाईल असे वक्तव्य अधिकारी यांनी मंगळवारी केले होते.
Mamata Banerjee: जर आता महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू झाल्या आणि टीएमसी प्रमुख महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पराभूत झाला, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
सीबीआयने मागील आठवड्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिषेक बॅनर्जी यांची ओळख न दर्शविता, फक्त त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. आरोपपत्रात सांगितल्याप्रमाणे बॅनर्जी यांनी बेकायदा नियुक्ती झालेली असतानाही १५ कोटी रुपयांची मागणी केली.
CM Mamata Banerjee: महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाले होते.
दिल्लीत तब्बल २७ वर्षांनी भाजपाचा विजय झाला असून ७० पैकी ४८ जागा जिंकत भाजपाने बहुमत प्रस्थापित केले. त्यानंतर आता भाजपाचे नेते पश्चिम बंगालमध्येही विजय होईल, असे म्हणत आहेत.
Shatrughan Sinha Campaign for AAP: तृणमूल काँग्रेसचे खासदार, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासाठी प्रचार करणार आहेत.
काही महिन्यांपूर्वी राजभवनाने कोलकाता पोलिसांकडून परिसरातील सुरक्षा नाकारली होती. त्याऐवजी राजभवनात केंद्रीय फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पोलीस पथकाच्या बँडलाही राजभवनात प्रवेश नाकारण्यात आला.