ममता बॅनर्जी Photos
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री असून त्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या प्रमुख आहेत. याआधी त्यांनी सलग दोन वेळा म्हणजेच दहा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले आहे. २०११ सालापासून पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे.
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी १९९८ साली तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी पदं भूषवेलेली असून त्या देशाच्या रेल्वेमंत्री राहिलेल्या आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला १९७० साली सुरुवात झाली. १९७६ ते १९८० या काळात त्या पश्चिम बंगाल महिला काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. १९८४ साली त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यांतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
१९८४ साली त्यांच्याकडे भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९९१-१९९६ या काळात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सराकारमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास, युवक कल्याण आणि क्रीडा, महिला व बालविकास या विभागाच्या राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. काँग्रेस पक्षाशी वैचारिक मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी १९९९ साली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये रेल्वेमंत्रिपद भूषवले.
Read More