मणिपूर

मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.


१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.


हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.


Read More
Mallikarjun kharge Manipur violence
मणिपूरमध्ये हस्तक्षेप करा! मल्लिकार्जुन खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र

परिस्थिती हाताळण्यात केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याने नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडाल्याचा आरोप खरगे यांनी केला आहे.

Manipur Violence
Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘सीएपीएफ’च्या ५० तुकड्या पाठवण्यात येणार

Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने बैठक घेतली.

afspa in manipur
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळल्याने ‘अफ्स्पा’ लागू ; याचा अर्थ काय? भारतीय लष्कराला विशेषाधिकार मिळणार का? प्रीमियम स्टोरी

AFSPA in Manipur केंद्राने गुरुवारी मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा AFSPA) पुन्हा लागू केला.

Manipur violence loksatta editorial
अग्रलेख : मणिपुरेंगे!

वांशिक हिंसाचारात होरपळणाऱ्यांना वाचवण्यासाठी उभ्या केलेल्या सरकारी आश्रयछावण्यांतील निर्वासितांचाही बळी पडत असेल तर त्यावरून तेथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे…

Manipur CM N. Biren Singh
Manipur : भाजपाला मोठा धक्का; कॉनराड संगमा यांच्या ‘एनपीपी’ने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला

Manipur : नॅशनल पीपल्स पार्टीने बिरेन सिंग सरकारला पाठिंबा काढून घेतला आहे.

Amit Shah Rally cancle
Amit Shah Rally: अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर निर्णय

Amit Shah Rally cancels: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील प्रचार थांबविला असून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. मणिपूरमध्ये परिस्थिती…

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले

जमावाने आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री सपम रंजन यांच्या लाम्फेल सानकीथेल भागातील घरावर हल्ला केला. त्यानंतर ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण…

Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी

Manipur Violence : सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या कारवाई दरम्यान सीआरपीएफचे दोन जवानही गंभीर जखमी झाले आहेत.

s Jaishankar
देशाची प्रतिमा मलिन करणे अयोग्य, मणिपूरप्रकरणी परराष्ट्र मंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल

मणिपूरवरून राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे परखड प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.

modi dont have time for Manipur marathi news
लोकमानस: मोदींना मणिपूरसाठी वेळ नसावा?

वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यास वेळ आहे, परंतु मणिपूरमधील हिंसाचार कमी करण्यास, आपल्याच देशातील जनतेला भेटण्यास मात्र वेळ नसावा…

pm modi Manipur violence
मणिपूर: चंद्राची अंधारलेली बाजू? प्रीमियम स्टोरी

मणिपूरमध्ये काहीही झाले, राज्य होरपळले, तरी मी भेट देणार नाही, अशी शपथच पंतप्रधानांनी घेतल्याचे दिसते. मूलत:च विभागलेल्या या राज्यातील स्थिती…

संबंधित बातम्या