मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत. यूपीएच्या काळात सलग दोनवेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांच्या नावे आहे. मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. पी. व्ही. नरसिंहराव हे जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या काळात मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री होते. देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याचं काम त्यांनी कायमच केलं आहे.
आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत लाज वाटण्यासारखं काहीही नाही म्हणणाऱ्या मनमोहन सिंग यांनी इतिहासाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. इतिहास त्यांना खरंच…