मनोज जरांगे पाटील News

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते असून ते मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. मनोज जरांगे यांचा जन्म १ ऑगस्ट १९८२ रोजी बीड जिल्ह्यातील मारोती या गावात झाला. मात्र, काही वर्षांपूर्वी ते जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये स्थायिक झाले. मनोज जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. मनोज जरांगे यांचे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.


मनोज जरांगे यांनी काही वर्षांपूर्वी शिवबा या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेमार्फत त्यांनी मराठा आरक्षणासाठी गावागावात विविध आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी २०१२मध्ये ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं होतं. २०१३ ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली होती. यावेळी त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं होतं. तसेच छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं होते. २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. याशिवाय गोरीगंधारी येथे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.


Read More
manoj jarange patil latest marathi news
जरांगे प्रभाव की ‘लाडकी बहीण’? मराठवाड्यात निकालाची उत्सुकता

लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी ठरणारा जरांगे यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीमध्ये किती प्रमाणात टिकतो, ‘लाडकी बहिणी’चे मतदान नक्की कोणाच्या पारड्यात याची मराठवाड्यात…

Manoj Jarange patil Maratha
Maharashtra Exit Poll Updates : मनोज जरांगेंचा प्रभाव नाही? मराठा मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?

Maharashtra Assembly Elections 2024 Exit Poll Updates : १० पैकी ६ एक्झिट पोल्सनुसार महायुती जिंकून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.…

Marathwada politics
मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती प्रीमियम स्टोरी

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी निर्माण केलेल्या भाजपविरोधी वातावरणाला हवा देण्याचे पुरेपूर प्रयत्न महाविकास आघाडीने केले.

Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…” प्रीमियम स्टोरी

Manoj Jarange Patil on Kalicharan: स्वंयघोषित महाराज कालीचरण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावर आता मनोज…

manoj jarange patil health update
“मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, हे शरीर कधी जाईल…”, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक विधान! फ्रीमियम स्टोरी

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मला दर ८-१५ दिवसांनी सलाईन लावावी लागते. मी तुम्हाला आधीपासूनच सांगतोय. कारण हे शरीर…”

those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका

मोदींच्या विकासाच्या दाव्यावर जरांगे यांनी तिरकस टीका केली. मुस्लीम, दलित व्यापाऱ्यांच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी राग आहे. तो मतदानातून व्यक्त होईल, असे…

Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या घोषणा करून अचानक माघार घेतली. जरांगे पाटील…

manoj jarange patil on babarao lonikar maratha voting statement,
“मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी” म्हणणाऱ्या बबनराव लोणीकरांवर मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, “त्यांना आता रस्त्यावर…”

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही त्या विधानावरून बबनराव लोणीकर यांना लक्ष्य केलं आहे.

prakash ambedkar criticized manoj jarange
प्रकाश आंबेडकर यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका, म्हणाले, निवडणुकीतून..! प्रीमियम स्टोरी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी जरांगे यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange influence is likely to benefit the state including Marathwada
माघारनाट्य मविआच्या पथ्यावर? मनोज जरांगे यांच्या प्रभावाचा मराठवाड्यासह राज्यात फायदा होण्याची शक्यता

निवडणुकीतून माघार घेण्याचा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या निर्णयाचा लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीलाच अधिक फायदा होऊ शकतो.

ताज्या बातम्या