मराठा आरक्षण Videos

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
Maratha protesters shout slogans during PM Narendra Modis speech in Pune
Narendra Modi : पुण्यात मोदींचं भाषण सुरु असताना मराठा आंदोलकाची घोषणाबाजी; पुढे काय घडलं?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेदरम्यान…

Manoj Jarange Patil will announce the candidates for the vidhansabha assembly elections 2024
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे करणार उमेदवारांची घोषणा, त्याआधी स्पष्ट केली भूमिका

विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार द्यायचे याचा निर्णय आधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा सामाजातील…

Prakash Ambedkar made a big statement regarding reservation
Prakash Ambedkar Video Message: आरक्षणसंदर्भात प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रिया करण्यात आल्या…

Manoj Jarange Patil made a big announcement regarding the assembly elections 2024
Manoj Jarange Patil: “ज्या ठिकाणी आपले उमेदवार…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटील यांनी आज (२० ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील…

Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE
Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE

बीडमधील नारायणगड येथे मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील…

Manoj Jarange Patil dashhara melava 2024 Live from Narayangad
Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE

बीडमधील नारायणगड येथे मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील…

maratha leader Manoj Jaranges press conference Live
Manoj Jarange Live: मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद Live

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. आचारसंहितेआधी आरक्षणसंदर्भातील मागण्या मान्य करण्याचा इशारा…

Manoj Jarange Patil talk about Maratha Reservation
Manoj Jarange Patil: : “आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा”; जरांगेंची सरकारकडे मागणी

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. “आचारसंहिता लागण्यापूर्णी आरक्षण द्या. नाही तर मी कोणालाही सोडणार नाही”, असा इशारा आता…

Manoj Jarnge Patil criticized Mahayuti government over the issue of Maratha Aarakshan
Manoj Jarange on Mahayuti: “आचारसंहितेच्या आधी आरक्षण द्या…”; मनोज जरांगे आक्रमक

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. शासनाकडून बैठकांचं सत्र सुरू आहे, मात्र त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. बैठकांमध्ये काही…

alcohol controversy obc activist lakshman hake alleges conspiracy aginst him
Lakshman Hake: कोंढव्यात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

पुण्यातील कोंढवा परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारू पिऊन मराठा आंदोलकांना शिवीगाळ करून, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी…

Manoj Jarange Patils life is precious Prithviraj Chavans request to State Govt
Manoj Jarange Patil Protest: जरांगे यांचा जीव मोलाचा- पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारला विनंती

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे यादिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने…

Sambhajiraje Chhatrapati meet maratha leader manoj jarange patil
Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मनोज जरांगेंची भेट; सरकारवर व्यक्त केला संताप

संभाजीराजे छत्रपतींनी आज (२३ सप्टेंबर) अंतरावली सराटी येथे मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली.…

ताज्या बातम्या