सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.
८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते. Read More