मराठी चित्रपट Videos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी चित्रपटांशी (Marathi Movie) सबंधित सर्व माहिती मिळेल. पारतंत्र्याच्या काळात मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत चित्रपट पोहोचला होता. १८९५ मध्ये लुमिअर बंधूंनी चित्रपटाचा पहिला शो मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये प्रदर्शित केला. १९१२ मध्ये पहिला मराठी चित्रपट ‘पुंडलिक’चे चित्रीकरण या शहरात झाले. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात ३ मे १९१३ या दिवशी प्रेक्षकांना तो पहिल्यांदा दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट (Indian Cinema) तयार केले. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचे जनक म्हटले जाते. फाळके यांच्याकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली. १९३१ नंतर बोलके चित्रपट प्रदर्शित होऊ लागले.


बोलपटांमुळे भाषानुरूप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर म्हणजे १९३२ मध्ये अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ‘प्रभात’चा संत तुकाराम हा चित्रपट १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. सिंहासन, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, जैत रे जैत, माझा पती करोडपती, पिंजरा, झपाटलेला, आम्ही जातो आमुच्या गावा, जगाच्या पाठीवर, मधुचंद्र, पाठलाग, सामना, हा खेळ सावल्यांचा, कळत नकळत, उंबरठा हे काही गाजलेले मराठी चित्रपट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळ्कर, अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्मिता पाटील, मोहन आगाशे, संध्या, रंजना, महेश कोठारे, सीमा देव, रमेश देव, काशिनाथ घाणेकर, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, गिरीश कर्नाड अशा अनेक नामवंत कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे दादा कोंडके; ज्यांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता,


जेव्हा विनोदी चित्रपट फार गाजत होते. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना खूप पसंती मिळते. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मराठी चित्रपट आणि कलाकारांसंबंधित सर्व अपडेट्स तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
Bigg Boss Marathi Winner Fame and Guligat aka Suraj Chavans film Raja Rani Demand for Ban
गुलिगत उर्फ सुरज चव्हाणच्या चित्रपटावर बंदीची मागणी; अभिनेत्याने मांडली व्यथा

Bigg Boss Marathi 5 फेम सूरज चव्हाण सध्या त्याच्या राजाराणी चित्रपटामुळे चर्चेत आहे. १८ ऑक्टोबरला सूरज चव्हाणची भूमिका असलेला हा…

journey of Ashok Saraf and Sachin Pilgaonkar great interaction with team navra maza navsacha 2
अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकरांचा ‘असा’ होता आतापर्यंतचा प्रवास | Sachin Pilgaonkar | Ashok Saraf

सचिन पिळगांवकर निर्मित-दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी…

navra maza navsacha 2 movie sachin pilgaonkar supriya pilgaonkar ashok saraf swapnil joshi and Hemal Ingle interview
बालगणेशाची मूर्ती निवडण्यामागचा होता ‘हा’ हेतू | Navra Maza Navsacha 2 Movie

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होतं आहे. २० सप्टेंबर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.…

navra maza navsacha 2 movie sachin pilgaonkar supriya pilgaonkar ashok saraf swapnil joshi and Hemal Ingle interview
बालगणेशाची मूर्ती कोणी निवडली? दुसऱ्या भागाची संकल्पना अन्…; ‘नवरा माझा नवसाचा २’च्या टीमशी गप्पा

मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा २’. मराठी रसिक प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट…

gharat ganpati marathi movie ashwini bhave ajinkya deo reunite in movie the after 25 years
Digital Adda: कोकणातील कुटुंब, मतभेद अन्…; ‘घरत गणपती’ चित्रपटातील कलाकारांशी दिलखुलास गप्पा

कोकणी माणसाचं अन् गणेशोत्सवाचं एक अजोड नातं असतं. गणपतीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र जमतं. ‘प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची’ ही गोष्ट…

Loksatta Digital Adda the great interaction with team Bai G marathi movie release on 12 july
Digital adda : परदेशात शूटिंग, अनोखी कथा, दमदार गाणी अन्…’बाई गं’ चित्रपटाचे पडद्यामागचे किस्से

एक नाही, दोन नाही, तीन नाही तर चक्क ६ बायकांबरोबर होणारा प्रेमाचा हा नेमका गोंधळ काय आहे? याचा उलगडा ‘बाई…

Marathi movies Bollywood to Cannes Chhaya Kadams Inspirational Journey
Digital Adda: कान्स गाजवणाऱ्या मराठमोळ्या छाया कदम यांचा प्रेरणादायी प्रवास प्रीमियम स्टोरी

फँड्री’, ‘सैराट’, ‘रेडू’ ते ‘लापता लेडीज’ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच छाया कदम. हिंदी चित्रपटामध्ये नावीन्यपूर्ण…

Digital Adda : मराठी चित्रपटांना सिनेमागृहात शो का मिळत नाहीत? महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
Digital Adda : मराठी चित्रपटांना सिनेमागृहात शो का मिळत नाहीत? महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर निर्मित, दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ चित्रपट १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच…

Gautami Patil Movie Ghungroo
Gautami Patil Movie Ghungroo: “माझा चित्रपट सर्वांनी नक्की बघा”; गौतमी पाटीलचं चाहत्यांना आवाहन!

गौतमी पाटील हे नाव गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत आहे. सदैव वादामुळे चर्चेत राहिलेली गौतमी पाटील ही लवकरच चित्रपटात…

Ekda Yeun tr Bagha Digital Adda
Digital Adda: मुसळधार पाऊस, उधळलेले गवे अन् सततचे रिटेक; ‘एकदा येऊन तर बघा’च्या टीमशी दिलखुलास गप्पा

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवीन हॉटेल, त्यात…

'बलोच'च्या शूटींDigital ADDA With Baloch New Marathi Movie गदरम्यान घडलेले किस्से
पाकिस्तान बॉर्डर, ५० ड्रिगी तापमानात शूट अन्…, ‘बलोच’च्या शूटींगदरम्यान घडलेले किस्से

पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या…

ताज्या बातम्या