मराठी मालिका News
लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.
‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.
Read More