मराठी रंगभूमीवर कौटुंबिक नातेसंबंध व सामाजिक विषयांवरील नाटकांचंच प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे. यापल्याडचं विश्व अपवादानंच रंगमंचीय अवकाशात अवतरताना दिसतं.
पथनाटय़ाच्या शैलीतून रंगमंचावर उलगडत जाणाऱ्या ‘पडघम’ या संगीतमय युवानाटय़ाचा दुसरा अंक सुरू होतो तो सायक्लोरामावर करारी मुद्रेतल्या प्रवीण नेर्लेकरची स्लाइड…