मेगा ब्लॉक News
मुंबईची जीवनदायनी अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनचे मध्य, पश्चिम आणि हार्बर असे एकूण ३ प्रमुख प्रकार पाहायला मिळतात. याशिवाय ठाणे ते वाशी या ट्रेनच्या मार्गाला ट्रान्स हार्बर असे म्हटले जाते. सकाळी ४ ते ४.३० च्या सुमारास लोकल ट्रेनचा प्रवास सुरु होतो. ट्रेनच्या असंख्य फेऱ्या या रात्री १२.३० ते १ च्या दरम्यान थांबतात. तेव्हा रात्री १ ते सकाळी ४ या सुमारास ट्रेनचा प्रवास बंद असतो. या काळात रेल्वेची दुरुस्तीची कामे सुरु असतात. त्यात रुळाची देखभाल, सिग्नल तसेच अन्य तांत्रिक गोष्टींमध्ये बदल केले जातात. पण या कामांसाठी हा वेळ पुरेसा पडत नाही. त्यामुळे रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक लावून ही कामे चार ते पाच तासांमध्ये करण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचारी, अधिकारी करत असतात. त्यामुळे मेगा ब्लॉक हा लोकलसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण असतो.
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणत्या दिवशी किती तासांसाठी मेगा ब्लॉक होणार हे फार आधीपासून ठरवले जाते. एका रविवारच्या मेगा ब्लॉकसाठीची तयारी एक आठवडा आधीपासून केली जाते. गँगमन, कीमन, पॉइंट्समन हे कर्मचारी लोकलचे रुळ, सिग्नलचे पॉइंट्स, ओव्हरहेड वायर अशा असंख्य तांत्रिक गोष्टी तपासून घेतात. त्यात दोष आढळल्यास त्यांची नोंद करतात. या नोंदी विद्युत, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी या भागांकडे पाठवल्या जातात. पुढे यातील प्रमुख विभागाकडून परिचालन विभागाला मेगा ब्लॉक घेण्यासाठीचे पत्र पाठवले जाते. हे पत्र तपासल्यावर परिचालन विभाग ब्लॉकची वेळ, गाड्यांचे वेळापत्रक वगैरे पाहून मेगा ब्लॉकचे वेळापत्रक ठरवतात. त्यानंतर हे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. शिवाय प्रवाशांनीही मेगा ब्लॉकची माहिती दिली जाते.
मेगा ब्लॉक (Mega Block) हे लोकसत्ता डॉट कॉमचे एक महत्त्वपूर्ण पेज आहे. या पेजवर मेगा ब्लॉक या विषयाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच वाचकांनी नव्या अपडेट्ससह येथे वाचायला मिळतील.
Read More