मेघालय विधानसभा निवडणूक २०२३ Photos
१९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा मेघालय हे राज्य आसाम राज्याचा एक भाग होते. त्यानंतर १९६९ मध्ये आसाम पुनर्रचना कायदा संमत झाला. त्यानंतर २ एप्रिल १९७० रोजी मेघालय हे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले असले तरी २१ जानेवारी १९७२ रोजी त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. शिलॉंग हे शहर या राज्याची राजधानी बनले. तेव्हा आत्तापर्यंत मेघालयमध्ये १० विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात तेथे कॉंग्रेस आणि एपीपी हे पक्ष वर्चस्व टिकवून आहेत. तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी देखील मेघालयमध्ये हळूहळू प्रस्थापित झाले आहेत. एनपीपी (नॅशनल पिपल्स पार्टी) पक्षाचे कोनराड संगमा हे सध्या मेघालयचे मुख्यमंत्री आहेत. २०१८ मध्ये सुरु झालेला त्यांचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे.
मेघालय विधानसभेतील ६० जागांसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. २ मार्च २०२३ रोजी निकाल (Meghalaya Assembly Election Result 2023 ) घोषित झाले. नॅशनल पिपल्स पार्टीला २६ जागांवर, तर भाजपाला ३ जागांवर विजय प्राप्त झाला.Read More